हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रधानमंत्री जन धन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत (PMJDY) बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक वर देशातील गरीबांचे खाते उघडले गेलं . या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक मोठ्या सुविधा दिल्या जातात. जर तुम्हाला तुमच्या खात्याची बॅलेन्स चेक करायचा असेल, तर तुम्ही घरबसल्या फक्त एका मिस्ड कॉलद्वारे त्याची माहिती मिळवू शकता. त्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
असा चेक करा खात्यावरील बॅलेन्स –
तुम्ही तुमच्या जन धन खात्यातील बॅलेन्स दोन प्रकारे चेक करू शकता. एक म्हणजे मिस्ड कॉलद्वारे आणि दुसरा मार्ग म्हणजे PFMS पोर्टलद्वारे. अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटांत घरबसल्या तुमचे स्टेटस तपासू शकता.
1) PFMS पोर्टलद्वारे-
PFMS पोर्टलद्वारे आपल्या खात्यावरील रक्कम जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जा.
आता इथे तुम्ही ‘Know Your Payment’ वर क्लिक करा.
यानंतर तुम्ही तुमचा खाते क्रमांक टाका.
आता तुम्हाला येथे खाते क्रमांक दोनदा टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्ही दिलेला कॅप्चा कोड भरा.
यानंतर तुमच्या खात्यातील शिल्लक तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
2) मिस्ड कॉलद्वारे असा चेक करा बॅलेन्स-
तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा आपल्या जनधन खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. या अंतर्गत, जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जन धन खाते असेल, तर तुम्ही 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाइल क्रमांकावरून मिस्ड कॉल करावा लागेल.