दसऱ्याला नवीन गाडी घेताय?? पहा जास्त मायलेज देणाऱ्या या ‘4’ बाईक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सणासुणीचा काळ असून अनेकजण नवनवीन वस्तू- गाड्या घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातच तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हांला अशा ४ दुचाकी गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता तसेच या गाड्यांचे मायलेजही जास्त आहे.

1) बजाज प्लॅटिना 100-

बजाज प्लॅटिना 100 या गाडीची खरेदीची किंमत 53 हजार रुपयापासून सुरू होते. 90 किमी प्रतितास एव्हडं टॉप स्पीड असलेली ही बाईक 70KM पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे. या बाईक मध्ये 102 cc 4-स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलेंडर इंजिन असून 5.8 kW मॅक्सिमम पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते.

bajaj platina 100

2) TVS स्पोर्ट-

TVS Sport या बाईकची खरेदीची किंमत ६० ते ६५ हजारांपर्यंत आहे. या बाईकला 109cc इंजिन असून ते 8.18bhp मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. TVS ची दमदार बाईक 110km पर्यंत मायलेज देऊ शकते. त्यामुळे सध्याच्या काळात ही बाईक नक्कीच परवडणारी आहे.

tvs sport

3) Bajaj CT110X-

Bajaj CT110X या बाईकची किंमत 66 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीमध्ये 115.45cc 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 8.6 PS मॅक्सिमम पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार , Bajaj CT110X 70 किमी पेक्षा जास्त मायलेज देते.

Bajaj CT110X

4) Hero HF Deluxe-

Hero HF Deluxe ही बाईक तुम्ही ६५,०० रुपयांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता. या गाडीमध्ये 97.2cc इंजिन असून ते 5.9kw मॅक्सिमम पॉवर आणि 8.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार Hero HF Deluxe 100km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.

Hero HF Deluxe-