1 ऑक्टोबरपासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक इनव्हॅलिड होणार, त्वरित आपल्या बँकेला कॉल करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बँक ग्राहकांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. दोन दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबर पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) ची जुनी चेकबुक इनव्हॅलिड होतील. 1 ऑक्टोबर 2021 पासून ओरिएंटल बँक, अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक इनव्हॅलिड होतील. यामागचे कारण म्हणजे ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 रोजी पंजाब नॅशनल बँकेत झाले आहे आणि आता ते प्रभावी झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ही माहिती दिली आहे.

1 ऑक्टोबरपासून जुने चेकबुक बंद होतील
PNB ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,”ई-ओबीसी आणि ई-यूएनआयचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून काम करणार नाहीत. ग्राहकांना सांगण्यात आले आहे की,” ज्यांच्याकडे OBC आणि UNI बँकांचे जुने चेकबुक आहेत, त्यांनी ते लवकरच नवीन चेकबुकसह बदलून घ्यावे, अन्यथा जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून इनव्हॅलिड होतील. नवीन चेकबुक अपडेट IFSC कोड आणि PNB च्या MICR कोडसह येईल.

नवीन चेकबुकसाठी अर्ज कसा करावा ?
नवीन चेकबुकसाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. याशिवाय बँकेचे ग्राहक चेकसाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकतील. आपण इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे चेकबुकसाठी अर्ज करू शकता.

आपण टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता
जर ग्राहकाला चेकबुकच्या व्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये असे वाटत असेल तर नवीन चेकबुक घेणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला भेट देऊन नवीन चेकबुक सहज मिळवू शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक 18001802222 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

नवीन IFSC आणि MICR कोड काय आहेत ते जाणून घ्या
इंडियन फायनांशियल सिस्टीम कोड (IFSC) हा 11 अंकी कोड आहे. या कोडमध्ये, पहिली चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात. ऑनलाइन पेमेंट करताना IFSC चा वापर केला जातो. प्रत्येक बँकेचा वेगळा IFSC असतो. त्याच वेळी, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन (MICR) कोड हा 9 अंकी कोड आहे. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम वापरणाऱ्या बँक शाखा ओळखतात.

Leave a Comment