India vs England, 1st Test: अश्विननं घडवला इतिहास; ११४ वर्षांत जे कुणाला जमले नाही ते करून दाखवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई । चेन्नई टेस्टमधील इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. त्यामुळे भारतावर पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. मात्र, टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दुसऱ्या डावाची पहिली ओव्हर रविचंद्रन अश्विनला दिली. आणि गेल्या ११४ वर्षांत जे कुणालाच न जमले नाही असा पराक्रम अश्विननं करून दाखवला.

रविचंद्रन अश्विननं ( R Ashwin) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ( Rory Burns) याला बाद केलं. अजिंक्य रहाणेनं स्लीपमध्ये झेल टिपला आणि विराट नाचू लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर गेल्या ११४ वर्षांत फिरकी गोलंदाजाला विकेट घेता आली नव्हती. आर अश्विननं हा विक्रम करून दाखवला.

यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर आज अश्विननं ही कामगिरी करून दाखवली.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा : 

 

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.