Accident News| देशभरात सरकार नवनवे महामार्ग उभारताना असताना दुसरीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात ही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कारण, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार तर 15 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्व जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. याचवेळी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट जाऊन एका लॉरीला धडकली. ज्यामुळे बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना आपला जीव गमवावा लागला. पुढे या जखमींना उपचारासाठी तातडीने चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आणि मृतदेह पुढील वैद्यकीय औपचारिकतेसाठी पाठवण्यात आले.
बुधवारी झालेल्या अपघातात 9 जणांना मृत्यू (Accident News)
या अपघातापूर्वीच बुधवारी तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident News) सुमारे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली, बुधवारी कल्पक्कममध्ये गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले होते. ज्यामुळे ती एका झाडाला जाऊन धडकली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 5 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे 5 तरुण पुद्दुचेरीहून परतत होते. तर दुसऱ्या अपघातात चेन्नईच्या मधुरमगाम येथे कार आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.