सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वीकेंड लाॅकडाऊनला लोकांनी स्वच्छेने सहभाग घेताला आहे. कुठेही गालबोट लागले नाही. छ. उदयनराजे भोसले संपूर्ण राज्यातील वाढत चाललेल्या कोरोना रूग्णांची संख्येचा थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. शासनाने लाॅकडाऊन फार आनंदाने लावलेला नाही. केवळ रस्त्यांवर उतरून भीक मांगो आंदोलन करण्याचा प्रकार उचित नाही व योग्य नसल्याचे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा येथे पोलिस मुख्यालयात वीकेंड लाॅकडाऊन विषयी गृहराज्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी छ. उदयनराजे भोसले यांनी भीक मांगो आंदोलन केले याविषयी विचारले असता ते म्हणाले, शासनाने लाॅकडाऊन आनंदाने लावलेला नाही आणि छ. भोसले यांनी रस्त्यांवर उतरून भीक मांगो आंदोलन करणे योग्य नाही.
जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा उपाय आहे. छ. उदयनराजे भोसले हे भाजपाचे खासदार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांच्या बरोबर चर्चा होणार आहेत. त्यांचे नेते चर्चेत सहभागी होणार आहेत. तेव्हा सर्वपक्षीय बैठकीत जे काही ठरेल त्यांचे राज्यातील जनतेने पालन करावे, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा