हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले.. यात साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता… त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ.. खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या…त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते…पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे…बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख… त्यांचं राजकारण टिकलं आणि वाढलं ते देखील याच पुरोगामी विचारामुळे…त्यामुळे भुजबळ अजित दादांसोबत जाऊन हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा शॉक कार्यकर्त्यांना बसणारच…बंड झाल्यानंतर सुरुवातीला भुजबळांनी सर्वात फ्रंटला येऊन अजित दादांची कढ घेऊन शरद पवारांना चांगलं सुनावलं…शरद पवारांना अंगावर घेण्याची धमक त्यांनी दाखवली…पण काळ पुढे गेला…लोकसभेच्या निवडणुका आल्या…गेल्या…मधल्या काळात बराच ड्रामाही झाला…पण या सगळ्या प्रोसेसमध्ये भुजबळ शांत झाले होते…
महायुती आणि अजितदादा अडचणीत येतील असे अनेक स्टेटमेंटही त्यांनी केले…लोकसभेच्या उमेदवारीवरून आणि आता तर राज्यसभेवरूनही त्यांची पक्षावरची नाराजी लपून राहिली नाही…त्यामुळे अजितदादा गटात सेफ राहून भुजबळांना आता ओढ मात्र साहेबांची लागलीये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे…बाकीच्यांनी परतीचे दोर कापले असताना भुजबळ दोन्ही गटात बॅलन्स ठेवून कसे आहेत? सत्तेतल्या युतीपेक्षा त्यांना शरद पवारांचा नवानवखा पक्ष आपलासा का वाटतोय? छगन भुजबळ दादांचा हात सोडून साहेबांची तुतारी हातात कधी घेतील? भुजबळ हा एक नेता जाण्यानं अजितदादांना किती मोठा लॉस सहन करावा लागेल? याचंच केलेलं हे सविस्तर विश्लेषण…
भुजबळांना साहेबांची ओढ लागलीय असं म्हणायला पहिलं कारण ठरतं ते म्हणजे मान, अपमान आणि नाराजीनाट्य … जी सांगितलं होतं…पण सगळी तयारी करूनही लवकर तिकीट जाहीर झालं नाही… यामुळे आपला अपमान झाल्याचं सांगत भुजबळ स्वतः लोकसभेतून बाहेर पडले…मात्र त्याच वेळेस आपल्याला राज्यसभेचा शब्द देण्यात आला होता…मात्र असं असूनही जेव्हा ती वेळ आली तेव्हा सुनेत्रा पवार यांना राज्यसभा जाहीर झाली…आपल्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला इतकं हलक्यात घेतल्यामुळे सेल्फ इमेजला हा मोठा धक्का असल्याचं स्वतः भुजबळांनी बोलून दाखवलय..
यासोबत पक्षात आपण जेष्ठ असतानाही अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांच्याच शब्दाला जास्त महत्व दिलं जातं… हा पक्ष फक्त तिघांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का? असा नाराजीचा सुर भुजबळ खासगीत बोलून दाखवत असतात… थोडक्यात भुजबळ नाराज आहेत…त्यांच्या राजकारणाला कळत नकळत म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा.. पण नख लावण्याचा प्रकार अजितदादा गटाकडून होतोय, असं बोललं जातंय… यापेक्षा शरद पवार गटात नेतृत्वाची कमी आहे…पहिल्या फळीतील अनुभवी नेतेही अजित दादांसोबत आल्याने ही पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा विचार असू शकतो…अशा वेळेस छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार यासाठी होऊ शकतो…
भुजबळांना साहेबांची ओढ लागलीय असं म्हणायला दुसरं कारण ठरतं तर म्हणजे भूमिका आणि विचारसरणी
पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात भुजबळांनी अजित दादांची बाजू घेत शरद पवारांच्या विरोधात रान उठवलं होतं… मात्र काळ पुढे सरकत गेला तसे भुजबळ शांत होत गेले…त्यांनी शरद पवार गटावर वैयक्तिक टीका करणं टाळलं…पक्षाच्याही महत्त्वाच्या निर्णयात ते कधीच कॅमेरा दिसले नाही…याउलट शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे…शरद पवारांकडून मी कणखरपणा शिकलोय… यांसारखे स्टेटमेंट करून ते पक्षविरोधी भूमिका घ्यायला लागले… यातून त्यांना शरद पवार गटाची ओढ लागलीये…असं बोललं जाऊ लागलं…
यातलाच पुढचा मुद्दा येतो तो विचारसरणीचा… भुजबळांनी मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींचा मुद्दा तापवला… पण यामुळे राजकारणाच्या ऐन धामधुमीत जातीय विष पसरून मराठा समाज भुजबळांवर नाराज झाला…ओबीसींना खुश करण्याच्या नादात त्यांनी मराठ्यांचा राग ओढवून घेतला… याचा महायुतीला निकालात मोठा फटका बसल्याचंही बोललं गेलं…मराठा समाज आपल्यापासून दूर गेल्याची खंतही त्यांनी याआधीच बोलून दाखवलीय…त्यात भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्याने हिंदुत्वाचा लागणारा टॅग यामुळे भुजबळांची पुरोगामी पॉलिटिकल इमेज धोक्यात आलेली दिसतेय…त्यामुळे वेळीच सावरून शरद पवारांसोबत गेलो… तर आपल्याला राजकारण करायला बराच स्कोप मिळेल, असा भुजबळांचा थॉट असल्यामुळे ते शरद पवार गटात जाण्यासाठीची एक खिडकी अजूनही उघडी ठेवून आहेत…
मराठ्यांचा असणारा राग पाहता भुजबळ विधानसभा लढवू इच्छित नाहीत…त्यापेक्षा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न चालूय…महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा दिल्लीतल्या राजकारणात सध्या सेफ बेटिंग खेळता येईल, असा कदाचित त्यांचा विचार आहे…त्यात आपण राज्यसभेवर गेलो तर समीर भुजबळ यांना आमदारकी सोडून मुंबईच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून देण्याचा विचारही भुजबळ करत असतील…पण महायुतीत झालेली भाऊ गर्दी आणि त्यात पक्षातील वरिष्ठांकडून आपल्याला सिरियसली न घेण…हे भुजबळांच्या राजकारणाला नख लावू शकतं… त्यात आपली जुनी पुरोगामी विचाराची लाईन पुढे घेऊन जायची असेल तर सध्याच्या घडीला भुजबळांकडे शरद पवारांशिवाय दुसरा कोणता चांगला पर्याय नाही…त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून सेफ गेम खेळणारे भुजबळ लवकरच शरद पवारांसोबत जातील, असं म्हणायला बराच स्कोप आहे… बाकी त्याची तारीख, वेळ आणि मुहूर्त काय असेल? हे आत्ताच सांगता येण तसं अवघड आहे…बाकी भुजबळांचं राजकारण कुठल्या राष्ट्रवादीसोबत असल्यावर जिवंत राहील असं तुम्हाला वाटतं? शरद पवार की अजित पवार? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.