छपाकमधील अ‍ॅसिड हल्लेखोराचे नाव बदलल्याने नेटिझन्सची दिपिकावर आगपाखड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। रिलीजच्या काहीच दिवस आधी दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटातील अ‍ॅसिड हल्लेखोराचे नाव बदलल्याच्या कथित बातमीवरून ट्विटरवर दीपिकावर नेटिझन्स नाराज झाल्याचे दिसत आहेत. छपाक हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यात जीव वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या दिग्दर्शका मेघना गुलजार यांनी चित्रपतील अ‍ॅसिड हल्लेखोराचे नाव नदीम खान बदलून राजेश असे ठेवले आहे. ऐनवेळी केलेल्या बदलामुळं लक्ष्मी अग्रवाल तीव्र नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. लक्ष्मीच्या वयाच्या १५ व्या वर्षी ३२ वर्षीय नदीम नावाच्या व्यक्तीनं लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. या वास्तविक घटनेतील हल्लेखोराचे खरं नाव चित्रपटात ठेवलं होत मात्र, ऐनवेळी नाव बदल्यामुळं अनेक तर्क-वितर्क लावत ट्विटरवर नेटिझन्सनी दीपिकाला ट्रोल केलं जात आहे.

चित्रपटात खरचं हा मोठा बदल करण्यात आला आहे का याबाबत अजूनही संभ्रम आहे. दीपिकाचा छपाक हा चित्रपट येत्या १० तारखेला प्रदर्शित होत आहे. त्यामुळं खरचं हा नाव बदलाचा प्रकार घडला आहे की नाही या प्रश्नाचे खरं उत्तर चित्रपटाच्या पहिल्या शोला कळणार आहे.

 

Leave a Comment