हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजकोट किल्ल्याच्या किनारी शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) हा पुतळा उभारण्यात आला होता. हैराण करणारी बाब म्हणजे २०२३ च्या डिसेंबर मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मालवण मध्ये येऊन या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केलं होते. मात्र अचानक का पुतळा कसा काय कोसळला याचे कारण समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र आता अवघीय ८ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामामुळेचाहा प्रकार घडला असा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळला असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर ज्यावेळी हा पुतळा तयार करण्यात येत होता त्यावेळीच स्थानिक लोकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असं समजून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.
दुसरीकडे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.