किल्ले प्रतापगडावर उद्या शिवप्रताप दिनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

Pratapgad Fort CM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे उद्या (दि.30) शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास सातारा जिल्हा वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. किल्ले प्रतापगडावर पर्यटकांच्या वाहनांमुळे गर्दी होऊ नये म्हणून महाबळेश्वर येथून एसटी बसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रतापगड परिसरात जागोजागी एलईडी स्क्रीनही लावण्यात आलेल्या आहेत.

किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या शिवप्रताप दिनास महाराष्ट्रसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले आहे. किल्ले प्रतापगडाला विद्युत रोषणाई बरोबर लेझर शोचेही आयोजन करण्यात आले आहे.