हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यामध्ये भाजपकडून देखील निवडणुकांमध्ये बाजी मारण्याची तयारी चालू आहे. नुकतीच भाजपने रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी श्रावण महिन्याच्या काळात गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ‘लाडली बहना योजने’च्या योजनेत वाढ करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
नुकतीच भोपाळच्या जंबोरी मैदानावर महिलांची परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये लाखो महीला सहभागी झाल्या होत्या. यावेळीच शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजनेच्या योजनेत वाढ होणार असल्याची माहिती दिली. तसेच, गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मतदार टिकून राहण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हणले जात आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
भोपाळच्या जंबोरी मैदानावर चौहान यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “मी एका क्लिकवर तुमच्या खात्यात राखीसाठी २५० रुपये टाकत आहे. जेणेकरून तुम्हाला राखी चांगल्या प्रकारे रक्षाबंधन सण साजरा करता येईल. १० सप्टेंबरला एक हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा होतील आणि ऑक्टोबरपासून एक हजार २५० तुमच्या खात्यात जमा होतील” अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, “माझ्या बहिणींनो, आज मी ठरवले आहे की वाढीव वीजबिलाची वसुली होणार नाही. गरीब बहिणीचे बिल दरमहा शंभर रुपये आले तर त्याची व्यवस्था केली जाईल. माझ्या बहिणींनो आणि मुलींनो, आम्ही हे देखील ठरवत आहोत की सरकारी पदांमध्ये अशी अनेक पदे आहेत, ज्यावर सरकार नियुक्त्या करते, आता त्या पदांवर किमान ३५ टक्के नियुक्त्या मुली आणि महिलांच्या असतील” अशी माहिती चौहान यांनी दिली.