हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसानंतर आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. यावेळी “माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होते. खूपच काळजीपूर्वक घेत आज शाळेचे दार उघडले आहे. हे भविष्याचे तसेच विकासाचे उघडलेले दार आता बंद होऊ द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “शिक्षकांनी स्वत: बरोबर विद्यार्थ्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षणाची जागा बंधिस्त असता कामा नये, दारं खिडक्या उघड्या असायला हव्यात, निर्जुंतुकीकरण करताना विद्यार्थी आसपास नाहीत याची काळजी घ्या, विद्यार्थी जिथे बसतील तिथे त्यांच्यात अंतर असायला आहे. शौचालयांची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.”
शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद – LIVE https://t.co/QvfE4sKmJj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 4, 2021
राज्यात आजपासून आठवी ते बारावी वर्गाच्या शाळांना सुरुवात झाली. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.