मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात हजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात वाढत असलेल्या कोरोना परिस्थिती आणि अशात राज्यात हाती घेण्यात आलेला लसीकरणाचा कार्यक्रम आदी तसेच मराठा आरक्षण बाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आज भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुमारे बारा वाजता उच्च न्यायालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग हजर आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या विषयावरही मुख्यमंत्री ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे.

सुमारे अर्धा तास मुंबई उच्च न्यायालयात हि चर्चा सुरु असून आता संपूर्ण राज्याचं लक्ष या भेटीतील चर्चेवर लागलं आहे. या भेटीत मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्याशी नेमक्या कोणत्या मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. मुंबईसह राज्यात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत राज्य सरकारच पुढील काय नियोजन आहे? तसेच मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा देण्यासाठी अजून कोणकोणते पर्याय निवडले जाऊ शकतात? आदी प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे हे चर्चा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.