नांदेड | जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. नायगाव, धर्माबाद तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर देगलूर तालुक्यातील शेवाळा शेकापुर पुनर्वसन गावात 29 रोजी वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसात आसरा घेऊन थांबलेल्या पाच वर्ष सांची सूर्यकांत आडकूते या चिमुकलीवर जिल्हा परिषद शाळेच्या जिर्ण इमारतीची भिंत कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले.
29 मे रोजी सायंकाळच्या सुमारास हे मुलगी व पत्नीसह दुचाकीवर हायवे वरून येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी पुनर्वसित शेवाळा शेकापुर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे जीर्ण इमारतीत आश्रय घेतला.
मात्र, पावसाने इमारतीची एक भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. यात त्यांची मुलगी सांची भिंतीखाली दबून जागीच ठार झाली. तिचे वडील सूर्यकांत हे गंभीर जखमी झाले. आईलाही मुका मार लागला आहे.