Child Sale Crime | बाप रे ! 4 लाखांसाठी जन्मदात्या आईने विकले 2 महिन्याचे बाळ; डॉक्टरांसह 6 जण अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Child Sale Crime | आपल्या समाजात दररोज काही ना काही प्रकार घडतच असतात. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तो म्हणजे एका लहान अडीच महिन्याच्या बाळाचा चार लाख रुपयांसाठी सौदा केलेला आहे. यासाठी बनावट कागदपत्र तयार केलेली आहे. आणि त्याच्या अडीच महिन्याच्या बालकाची चार लाख रुपयांसाठी विक्री केलेली आहे. आता या विक्री करणाऱ्या रॅकेटचा स्पर्धा फाश केलेला आहे. यासंदर्भात बाल संरक्षण शाखा आणि महिला ठाण्याच्या पोलिसांनी डॉक्टरांसह इतर सहा आरोपींना देखील अटक केली आहे.

हा प्रकार दावणे गेले येथील एम के मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे. यावेळी डॉक्टर भारती बालकाची आई काव्या तसेच ते बाळ विकत घेणारे दांपत्य जया आणि प्रशांतकुमार तसेच मध्यस्थी वादीराज यांना देखील अटक करण्यात आलेले आहे. आरोपींनी त्यांचा गुन्हा देखील कबुल केलेला आहे. आणि त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवलेले आहे. तसेच या अडीच महिन्याच्या बाळाला बाल संगोपन केंद्रात नेण्यात आलेले आहे.

या प्रकरणाची माहिती चाइल्ड हेल्पलाइन वर्क कॉल करून एका निनामी व्यक्तिने दिली काव्याच्या एका बालकाची जयाने प्रशांत कुमार कुरडेकर यांना एम के मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर भारती आणि मध्यस्थी वारजेदार आणि यांच्यामार्फत विक्री केलेली आहे. या दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण शाखेच्या कविता आणि त्यांच्या पथकाने जया आणि प्रशांत कुमार यांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्या बाळाच्या जन्म दाखल्यासह इतर काही बनावट कागदपत्र देखील सापडले.

या कागदपत्रानुसार जया आणि प्रशांतने 26 ऑगस्ट रोजी या बालकाला जन्म दिल्याचे खोटे कागदपत्र तयार केलेले होते. त्यानंतर त्या कागदपत्राच्या आधारे रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता. त्या बाळाची विक्री झाल्याचे समोर आले. काव्या हीने काही दिवसापूर्वीच पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी तिने या बाळाला जन्म दिलेला आहे. नंतर तिने त्या मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे जया आणि प्रशांत यांच्या लग्नाला सात वर्षे झाले आणि सात वर्षानंतरही त्यांना मूलबाळ नाही. त्यावेळी त्यांनी डॉक्टर आणि मध्यस्थी यांच्यामार्फत चार लाख रुपयांना ते बालक विकत घेतले आहे असे माहिती समोर आली आहे.

या तपासानंतर आरोपींविरुद्ध अनेक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दलची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रशांत यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्या मुलाची आई काव्या हिने सांगितले की, तिला त्या बाळाला सांभाळणे शक्य होत नसल्याने तिने तिच्या मर्जीने त्या मुलाची विक्री केलेली आहे.