हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस शाळांबरोबर कोचिंग क्लासेसचे प्रमाण देखील वाढत चालले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन आणलेल्या नियमानुसार आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच सर्व कोचिंग क्लासेसला चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. या मार्गदर्शक सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
सध्याच्या काळात पाहिला गेलो तर, राज्यामध्ये अनेक नवनवीन कोचिंग क्लासेस उभे राहत आहेत. हे कोचिंग क्लासेस मुलांना खोटी आश्वासने देखील देत आहेत. त्यामुळे या कोचिंग क्लासेसला कायद्याच्या चौकटीत ठेवण्याची तितकीच गरज आहे. त्यामुळेच खाजगी कोचिंग क्लासेसला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. ही सर्व मार्गदर्शक तत्वे पाळणे कोचिंग क्लासेसला बंधनकारक असेल.
मार्गदर्शक सूचना कोणत्या?
मुख्य म्हणजे, कोचिंग क्लासेसचा दबावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये ज्या प्रमाणात वाढ होत आहे आणि अशा घटना समोर येत आहेत त्यामुळे देखील सरकारकडून ही मार्गदर्शन तत्वे घालण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये, इथून पुढे कोणतीही कोचिंग क्लासेस पदवी पेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकणार नाहीत. तसेच, कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकणार नाहीत. कोचिंग क्लासेस पालकांना विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्याची किंवा चांगले गुण मिळवून देण्याची हमी देऊ शकणार नाहीत.
याचबरोबर कोचिंग क्लासेस सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकणार नाहीत. कोणत्याही विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवे. विद्यार्थ्यांची किंवा पालकांची दिशाभूल करणारी जाहिरात कोचिंग क्लासेसला प्रसिद्ध करता येणार नाही. कोचिंग क्लासेस नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या ते शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाहीत. या मार्गदर्शक तत्वांचे समुपदेश प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. याबरोबर कोचिंग क्लासेस च्या वेबसाईटवर ट्यूटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा शुल्क याची माहिती दिलेली असावी.