Vande Bharat Express मध्ये जेवणाच्या ट्रे वर बसली लहान मुले; फोट शेअर करत रेल्वे अधिकाऱ्याने साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा वापर करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांकडून अनेकदा रेल्वेच्या सोयी सुविधेबाबत प्रवाश्यांकडून अनेक तक्रारी येत असतात. त्यावरती सोशल मीडियावर अनेकांना ट्रोलही केले जाते. रेल्वेच्या गैरसोयबद्दल बोलले जाते. यावर उपयोग योजना करा म्हणून नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र यावेळची गोष्टच वेगळी आहे. यावेळी कोण्या प्रवाशाने नव्हे तर एका रेल्वे अधिकाऱ्यानेच प्रवाशांबाबत तक्रार केली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.

फोटो पोस्ट करत केली तक्रार

वंदे भारतचा बोलबाला हा मागच्या काही दिवसांपासून प्रचंड वाढला आहे. परंतु त्याबाबतीत अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या. आता यावेळी अनंत रूपानागुडी नावाच्या एका रेल्वे अधिकाऱ्यानी एक पोस्ट शेअर करत प्रवाश्यांबद्दल तक्रार केली आहे. त्यांनी यामध्ये दोन लहान मुलांचे फोटो शेअर केले आहे. आणि म्हंटले की, “वंदे भारत आणि इतर ट्रेनमध्ये स्नॅक्स ट्रे तुटण्याचे कारण प्रवासीच आहेत. कारण तुम्ही या फोटोत पाहू शकता की, ही दोन लहान मुलं स्नॅक्स ट्रे वरती बसलेले आहेत. अश्या वागण्यामुळे ट्रे तुटतो आणि तो खराब झाला की मग हेच प्रवासी रेल्वेत सुविधा नाहीत म्हणून तक्रार करतात असे सदर अधिकाऱ्याने म्हंटल आहे.

फोटो खरा की खोटा?

रेल्वे अधिकाऱ्यानी केलेल्या तक्रारीचा फोटो हा खरा आहे की खोटा हे अजून समजू शकले नाही. हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. त्यावर्ती अनेकांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. काहीजण म्हणतात यावर्ती उपाय शोधले गेले पाहिजे तर काही म्हणतात आई – वडिलांकडून या नुकसानीची भरपाई घेतली पाहिजे. ही पोस्ट एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पहिली आहे. तर यास आतापर्यंत 1 हजारहुन जास्त लाईक मिळाल्या असून 350 पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.