हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दक्षिण अमेरिकेतील चिल्लीमधील जंगलात भीषण (Chile Forest Fire) आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगेमध्ये तब्बल 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली आहेत. सध्या जंगल परिसरामध्ये ही आग झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान या आगीला विझवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही आग लागल्यामुळे सरकारने आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे.
92 जंगले आगीच्या तडाख्यात..(Chile Forest Fire)
समोर आलेल्या माहितीनुसार, चिल्लीमधील (Chile Forest Fire) आग सध्या वाढत चाललेली आहे. या आगीमुळे अनेक पशु-पक्षांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. तर 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्य म्हणजे दक्षिण अमेरिकेतील 92 जंगले या आगीच्या तडाख्यात सापडली आहेत. याबाबतची माहिती स्वतः चिल्लीचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री कैरोलिना टाहो यांनी दिली आहे. तसेच पुढे जाऊन मृतांच्या संख्येत देखील वाढ होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, भीषण आगीच्या दुर्घटनेमुळे विला इंडिपेंडेंसिया मधील अनेक घरे आणि व्यावसायिकांची दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या आगीने नागरिकांचे मोठे नुकसान केल्याचे स्पष्ट दिसत आहे. चिल्लीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले की, “देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगले जळत आहेत. जेथे या आठवड्यात तापमान असामान्यपणे वाढले आहे. वालपरिसो परिसरात सर्वात भीषण आग लागल्याने अधिकाऱ्यांनी लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. वालपरिसो परिसरात तीन निवास छावण्या उभारण्यात आल्या आहेत. प्रशासन यंत्रणा ही आग विझवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे.”