Chilled Water Side Effects | तुम्हीही कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी पिताय?? त्यापूर्वी ‘हे’ धोके जाऊन घ्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. अशावेळी अनेक लोक हे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक थंड पदार्थ खातात किंवा अनेक थंड पेय पितात. उन्हाळ्यामध्ये सहसा अनेक लोक फ्रीजमधील थंड पाणी (Chilled Water Side Effects) पितात. अगदी कडक उन्हातून आले, तरी घरात येऊन आधी ते फ्रीजमधील बॉटल काढून थंड पाणी पितात. थंड पदार्थ किंवा थंड पाणी पिल्याने आपल्याला तात्पुरता आराम मिळतो तसेच आपल्या शरीरातील उष्णता दूर होते. परंतु तुम्हाला तात्पुरता आराम देणारे हे थंड पाणी तुमच्या आरोग्याला खूप धोका निर्माण करू शकतात.

फ्रिजमधील थंडगार पाणी किंवा बर्फाचे पाणी (Chilled Water Side Effects) प्यायल्याने आपल्या आरोग्याला गंभीर हानी होते. अनेकांना ही गोष्ट माहित असते, तरी देखील ते थंड पाणी पीत असतात. या थंड पाण्यामुळे तुमच्या हृदयाला धोका निर्माण होतो. तुम्ही देखील खूप फ्रीजमधील थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी पीत असाल, तर आता या थंड पाण्यापासून तुम्हाला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. हे आपण जाणून घेऊया.

पचन समस्या

तुम्ही जर थंडगार पाणी पीत असाल, तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. तुम्ही नियमित थंड पाणी पीत असाल, तर खाल्लेले अन्न पचने कठीण होते. त्यामुळे पोटदुखी, मळमळ, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा त्या पाण्याचे तापमान हे आपल्या शरीराचे तापमानाशी जुळत नाहीत. त्यामुळे आपण खाल्लेले अन्न देखील पचत नाही.

डोकेदुखी | Chilled Water Side Effects

अनेकवेळा आपण गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंक्स पितो. परंतु त्यामुळे आपल्याला ब्रेन फीजची समस्या निर्माण होते. एवढेच नाही तर तुम्ही थंडगार पाणी पीत असाल किंवा जास्त आईस्क्रीम खात असाल, तरी देखील तुमच्या पाठीच्या कण्यातील संवेदनशील नसांवर याचा परिणाम होतो. आणि ज्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.

हृदयाचे ठोके मंद होतात

आपल्या शरीरात एक वेगस मज्जातंतू आहे. जी मानेद्वारे हृदय, फुफुस आणि पाचनतंत्र यांना नियंत्रित करते. तुम्ही जर अतिशय थंड पाणी पिले, तर तुमच्यात नसा या वेगाने थंड होतात आणि हृदयाचे ठोके आणि पल्स कमी होतात. या हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.

वजन वाढणे

तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त थंड पाणी पीत असाल, तर तुमच्या शरीरात साठलेली चरबी ही जड होते. आणि त्यामुळे ती चरबी कमी करणे कठीण होऊन बसते. तुम्ही सर्वजण कमी करण्याचा विचार करत असाल, तर अशा परिस्थितीत थंड पाणी पिणे टाळा.

घशाचा संसर्ग होतो

जास्त थंड पाणी पिल्याने तुमचा घसा खवखव करतो. त्याचप्रमाणे रक्त संचय होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शक्यतो थंड पाणी पिणे टाळा.