कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका! मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार । कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी मिरचीचे उत्पादन प्रचंड घटणार असल्याने मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी मिरचीच्या बहरलेल्या शेतांचे चित्र पाहण्यास मिळत असते. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. (Chilli price will rise).

दुसरीकडे यावर्षी मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्याचा मिरचीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला. त्यामुळे मिरचीचं उत्पन्न कमी झालं आहे. टीव्ही ९ मराठी वाहिनीच्या वृत्तानुसार, नंदुरबारचे मिरची उत्पादक शेतकरी माळी यांनी आपल्या तेरा एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना तीनशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न होत असते. मात्र या वर्षी उत्पन्नात तब्बल 70 टक्के घट झाली आहे. शेतीसाठी त्यांनी टाकलेलं भांडवलदेखील निघणे अशक्य असल्याचे माळी सांगतात.

नंदुरबार सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा असून दरवर्षी मिरची पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकार यांनी मिरची पिकांवर संशोधन करणारे केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या वर्षी मिरचीचे उत्पादन घटणार असल्याने लाल मिरचीचे दर तेजीत असतील. त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसणार आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादन घटणार आहे. मिरचीवर येणाऱ्या रोगांच्या संशोधनासाठी द्राक्ष आणि केळीप्रमाणे संशोधन केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in