भारतीय जवानांनी पुन्हा हाणून पाडला चिनी सैन्याचा घुसखोरीचा डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. गेल्या ३ दिवसांत चीनने तीन वेळा वेगवेगळ्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे चीन वाटाघाटी करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे घुसखोरी करीत आपला खरा चेहरा दाखवत आहे. पण प्रत्येक वेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी प्रयत्नांना हाणून पाडले आहे.

ब्रिगेडियर कमांडर लेव्हलवर भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरु असताना चीनने चुमार भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून 7-8 मोठी वाहने भारतीय सीमेकडे येत होती. परंतु चेपुजी छावणीजवळ जेथे भारतीय सैन्य आधीच तैनात होतं. त्यांनी चीनी सैनिकांना रोखलं. आता भारतीय सैन्याच्या वतीने या भागात आणखी सैन्य तैनात करण्यात आले आहेत. चिनी सैन्याच्या चिथावणीनंतर भारतीय सैन्य सध्या हायअलर्टवर आहे.

29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री आणि त्यानंतर 31 ऑगस्टच्या रात्री चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. चीनने पँगोंगच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीचा आधी प्रयत्न केला. त्यानंतर 31 ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांना काला टॉप या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. चिनी जवान त्या दिशेने येत असताना भारतीय सैनिकांनी त्यांना पाहिले आणि मेगाफोनवर इशारा दिला. त्यानंतर चीनी मागे फिरले.

चीनच्या सतत घुसखोरीच्या प्रयत्नांवर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, चीनने सीमेवर उकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा आम्ही राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चीनसमोर ठेवला आहे. या वादावर मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि ताज्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. सीमेवर असलेल्या चुशुल भागात अजूनही ब्रिगेडियर कमांडर लेव्हलवर चर्चा सुरु आहे. परंतु चीन एकीकडे शांतीचं आवाहन करतो आणि दुसरीकडे घुसखोरी आणि उकसवण्याचा प्रयत्न करत आहे.

यापूर्वी गलवान खोऱ्यातही भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना ठार केलं होतं. एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेल्या चीननं सीमेवरील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीन या दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.