चिनी कंपनी दीदी ग्लोबलने शेअर बायबॅक योजनेचा रिपोर्ट नाकारला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चिनी कंपनी दीदी ग्लोबल इंकने शुक्रवारी वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट नाकारला की,” जूनमध्ये अमेरिकेच्या IPO नंतर मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यावर ते शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहे.” वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की,”दीदी आणि तिचे बँकर्स गुंतवणूकदारांच्या तक्रारी दूर करण्यासाठी शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.”

चीनी सरकारने डेटा सिक्युरिटी आणि परदेशातील शेअर्सच्या लिस्टिंगच्या मुद्द्यावर देशातील मोठ्या कंपन्यांना इशारा दिला होता. 30 जून रोजी अमेरिकन बाजारात लिस्टेड झाल्यापासून दीदीचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले आहेत, कारण कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यात आले होते आणि त्याविरोधात डेटा सिक्युरिटीविरोधात तपास सुरू करण्यात आला होता.

“कंपनी पुष्टी करते की, वरील माहिती (वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट) अचूक नाही,” दीदीने आपल्या वेबसाइटवर सांगितले. सायबर सिक्युरिटी समीक्षेमध्ये चीनच्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.