Chinnaswamy Stampede : RCB च्या बड्या व्यक्तीला अटक; चेंगराचेंगरी प्रकरणी ठोकल्या बेड्या

Chinnaswamy Stampede
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chinnaswamy Stampede । चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आरसीबीचे वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी निखिल सोसाळे यांच्यासह ४ जणांना अटक केली आहे. निखिल सोसाळे हे बंगळुरूहुन मुंबईला जात होते, त्याच वेळी आज पहाटे ६.३० वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह डीएनएचे तीन स्टाफ मेंबर्स किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्या सर्वांची क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे.

चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी (Chinnaswamy Stampede) भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली एफआयआर) नोंदवल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. बेंगळुरू पोलिसांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (KSCA) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA एंटरटेनमेंट यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांसह FIR दाखल केला होता. त्यानंतर आज उपायुक्त अक्षय यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गुन्हे शाखेने रात्री केलेल्या कारवाईत निखिल सोसाळे याना अटक करण्यात आली, तर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे दोन अधिकारी – सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम – फरार असून पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरु आहे.

आरसीबीच्या विजयाला गालबोट- Chinnaswamy Stampede

दरम्यान, रॉयल चॅलेंजर बंगळुरू आयपीएल इतिहासात प्रथमच चॅम्पियन झाल्यानंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर व्हिक्टरी परेड काढण्यात आली होती. मात्र याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त चाहत्यांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. पोलिसी बळ कमी पडलं. परिणामी या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला तर ४० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले. एकूण कार्यक्रमाला आणि आरसीबीच्या विजयाला गालबोट लागलं. कर्नाटक सरकारलाही यामुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले. बेंगळुरू मेट्रोपॉलिटन टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सीमंत कुमार सिंग यांची “तात्काळ बदली करण्यात आली आणि पुढील आदेशापर्यंत” अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि बेंगळुरू पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.