Chitra Wagh On Sanjay Raut : अहो रडतरौत, थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? शहाणे व्हा; चित्रा वाघ यांचा राऊतांवर प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करत धक्का दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर हे दोनच उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुरस्कृत असलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता अस संजय राऊतांनी म्हंटल होते. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना सुनावलं आहे. थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? आता तरी शहाणे व्हा असं चित्रा वाघ यांनी म्हंटल.

याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल अहो, रडतरौत सर्वज्ञानी, संजय राऊत पराभव मान्य करायला सुद्धा मोठं मन लागतं. हातात आमदार नसताना ‘हात दाखवून अवलक्षण’ का केलं? थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? तुमच्या विकृत आघाडीकडं आमदार नव्हते, त्यामुळं घोडेबाजार करण्याचा तुमचाच प्रयत्न झाला, हे आधी मान्य करा. नाक कापलं तरी भोकं आहेत, हे तुमचं ब्रीद वाक्य सगळ्यांना माहीत आहे. मुख्य म्हणजे शेकाप च्या जयंत पाटलांना शरद पवार गटानं उमेदवारी दिली होती, त्यांच्याकडं असलेली मतं देखील पडली नाहीत आणि काँग्रेसनं तर तोंडावरच पाडलं. शहाणे व्हा!

संजय राऊत काय म्हणाले होते?

काल आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअरबाजाराप्रमाणे अपक्ष आमदारांचा आणि लहान पक्षाचा भाव कसा चढत होता हे आम्ही पाहिलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ज्यांना 23च्या पुढे मते पडली. त्यांचा भाव समजून घ्या. नुसता भाव नव्हता. काही आमदारांना दोन एकर जमीन देण्यात आली आहे. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे. तो 20 ते 25 कोटीपर्यंत आहे. महाविकास आघाडी हा खेळ खेळणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांची ‘समृद्धी’ वाढली आहे, त्यातून हा पैसा जाऊ शकतो, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.