#HappyChristmas | ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मात या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता असे मानले जाते. ख्रिसमसच्या निमित्ताने जाणुन घेऊयात नाताळ बद्दलच्या काही हटके गोष्टी
१) नाताळ हा मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जाणारा सण आहे.
२) काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.
३) ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
४) या सणात एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्र्परांचे अभिनंदन करण्यात येते. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट(नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.
५) याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.