CIBIL Score : सर्वात कमी व्याजदरात कर्ज हवंय? हे काम कराल तर बँकांच तुमच्या मागे येतील…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (CIBIL Score) । सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे पगार (Payment), इन्कम (Income) कमी झालाय. अनेकजण अशात नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र बँका (bank) कर्ज द्यायला तयार नसल्याने पैशांची पूर्तता करणं कठीण होऊन बसलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही केल्या तर बँका स्वतःहून तुमच्या मागे मागे येतील.

तुम्ही नोकरदार असा किंवा शेतकरी किंवा गृहिणी, आता स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. व्यवसाय करायचा तर मेहनत घेण्याची तयारी तुमची असणार आहेच. फक्त तुम्हाला सुरवातीची गुंतवणूक (Investment) उभी करणे अवघड जात आहे. मात्र आता काळजी करू नका आम्ही खाली दिलेल्या काही गोष्टींवर काम करा म्हणजे सर्व काही सोपे होऊन जाईल.

मित्रांनो तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर बँक सर्वात अगोदर तुमचा Cibil Score चेक करते. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँक तुम्हाला कर्ज सिबिल खराब असेल तर बँक तुम्हाला कर्ज देण्याची रिस्क घेत नाहीत. तेव्हा सिबिल स्कोर म्हणजे नक्की काय हे आपण अगोदर समजून घेऊयात.

CIBIL Score काय आहे?

अगदी सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर सिबिल स्कोर म्हणजे तुम्ही आजवर कोणाकडून कधी उसने पैसे घेतलेत का? घेतले असतील तर ते वेळेवर माघारी दिले आहेत का? याचा इतिहास होय. यावरून तुम्ही व्यवहाराला चांगले आहेत कि नाही याचा बँकेला अंदाज येतो. तुमचा पैशांच्या व्यवहाराचा इतिहास पाहून मगच बँक तुम्हाला कर्ज द्यायचं कि नाही हे ठरवते.

CIBIL स्कोअरची कसा चेक केला जातो?

CIBIL स्कोअर तुमच्या एकूण क्रेडिट इतिहासाच्या आधारावर मोजला जातो, ज्यामध्ये वेळेवर दिलेली कर्जे आणि प्रलंबित कर्जांची गणना केली जाते. क्रेडिट रेटिंग (Credit Card) हा CIBIL स्कोर तयार करते. देशात सध्या 4 क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत.

CIBIL Score किती असावा?

CIBIL स्कोअर 300 ते 900 पर्यंत असणे गरजेचे आहे.
तुमचा CIBIL स्कोर जितका जास्त असेल तितके कर्ज मिळवणे सोपे होईल.
कारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँक प्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासते.

सिबिल स्कोअर विनामूल्य कसे तपासायचे?

CIBIL Score विनामूल्य तपासण्यासाठी CIBIL वेबसाइट सर्वात विश्वसनीय मानली जाते.
CIBIL ही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे जी क्रेडिट स्कोअर तयार करते.
या वेबसाइटवर, तुम्ही CIBIL स्कोअर फक्त 1 वेळा विनामूल्य तपासू शकता, नंतर तुम्हाला त्यांची योजना खरेदी करावी लागेल.
सिबिल स्कोअर तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सिबिलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
CIBIL साइटचे मुख्यपृष्ठ उघडेल, तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल, तेथे विनामूल्य CIBIL स्कोर तपासण्याचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.

एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला मेल आयडी पासवर्ड, नाव, पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, पिन कोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. पुढील पृष्ठावर, तुम्हाला सबस्क्रिप्शन योजना निवडण्याचा पर्याय मिळेल, तुम्हाला खाली No Thanks वर क्लिक करावे लागेल.
हा OTP तुम्हाला पडताळणीसाठी पाठवल्यानंतर लगेच, तुम्हाला तो टाकून पडताळणी पूर्ण करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, तुम्हाला तुमचा CIBIL स्कोर दाखवला जाईल.
तथापि, तुम्ही वर्षातून फक्त एकदाच CIBIL Score तपासू शकता, दुसऱ्यांदा तुम्हाला सबस्क्रिप्शन योजना खरेदी करावी लागेल.