CIBIL Score | आपल्याला अनेकवेळा बँकेतून कर्ज घ्यावे लागते. परंतु हे कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असणे खूप गरजेचे आहे. कोरोना काळानंतर देशातील अनेक लोकांचा क्रेडिट स्कोर हा खूप डाऊन झालेला आहे. कधी कधी लोकांनाच कळत नाही की, त्यांचा सिबिल स्कोर (CIBIL Score) खराब होत आहे. त्यांच्या नकळतच त्यांचा सिबील स्कोर खराब होतो आणि पुढे त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकवेळा लोक क्रेडिट कार्ड वापरतात. परंतु त्याचे वेळेवर पेमेंट करायचे विसरतात. त्यामुळे क्रेडिट स्कोर खराब होतो आणि तो ठीक होण्यासाठी खूप वेळ लागतो.
तज्ञांच्या असे म्हणणे आहे की, तुमचा सिबिल स्कोर थोडासाही खराब होऊ लागला, तर ते सुधारण्याचे प्रयत्न तुम्ही सुरू केले पाहिजे. तुम्ही जर तसे केले नाही तर तुम्हाला बँकेकडून क्रेडिट मिळण्यात देखील अडचण येईल. कधी कधी तर कार्ड बंद देखील होते. आता हा स्कोर कसा निश्चित करायचा असा सगळ्यांना प्रश्न पडतो. त्यासाठी तुम्हाला खालील काही उपाय करावा लागेल ज्याद्वारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर सुधारू शकता.
अशा पद्धतीने सुधारणा सिबिल स्कोर | CIBIL Score
तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा
तुमच्या क्रेडिट रिपोर्टची एक प्रिंट सिबिल किंवा देशातील इतर क्रेडिट ब्युरोकडून मिळवा. त्यानंतर तुमच्या या सिबिल स्कोरवर ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत याची माहिती जाणून घ्या.
तुमची बिले वेळेवर भरा
तुमचे जर क्रेडिट कार्डचे बिल भरले नसेल तर त्या तुमच्या सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कर्ज, EMI युटीलिटी ही तुमची सगळी बिले वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.
क्रेडिट युटीलायझेशन रेशो कमी करा
तुमच्या क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा कमी ठेवा. तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापरू नका. अन्यथा याचा तुमच्या सिबिल स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो.
एकापेक्षा अधिक क्रेडिट एप्लीकेशन टाळा
ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता. तेव्हा ते तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर एक सीट निर्माण करतो. त्यामुळे तुमचा स्कोर तात्पुरता कमी होऊ शकतो.
तुमच्या क्रेडिट स्कोरचे नियमितपणे निरीक्षण करा | CIBIL Score
तुमच्या क्रेडिट स्कोर चे नियमितपणे निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. अनेक बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट स्कोर तपासण्यासाठी मोफत सेवा देखील देत असतात.
थकबाकी वेळेत भरा
तुमची जर खात्यात थकबाकी असेल तर ती जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वेळेवर भरून टाका.
क्रेडिट बिल्डिंग उत्पादनाकडे लक्ष द्या
तुमची क्रेडिट फाईल कमी असल्यास तुमचा क्रेडिट स्कोर कमी असल्यास क्रेडिट बिल्डर अर्ज किंवा सुरक्षित क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करा. तुम्ही अजूनही तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी संघर्ष करत असेल तर क्रेडिट सल्लागाराची देखील तुम्ही मदत घेऊ शकता.