CIDCO Lottery 2024 : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 903 घरांसाठी लॉटरी निघणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपलं हक्काचं घर असणं ही एक खूप मोठी बाब आहे. अशातच म्हाडा, सिडको अशा संस्थानकडून मुंबईत बजेटमध्ये घर घेण्याची संधी मिळते. म्हाडाची मुंबई लॉटरी आधीच निघाली आहे. यामध्ये 2030 घरांचा समावेश आहे. मात्र तुमची ही संधी हुकली असेल तर चिंता करू नका कारण सिडको (CIDCO Lottery 2024) तुम्हाला संधी देत आहे.मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतल्या 903 घरांसाठी लवकरच लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईत असणारी ही घर कोणत्या ठिकाणी आहेत असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही घरं खारघर, कळंबोली आणि घनसोली या नोड मध्ये असणार आहेत.

213 सदनिका उपलब्ध – CIDCO Lottery 2024

या तिन्ही नोड मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 सर्वसामान्य गटासाठी 175 अशा एकूण 213 सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर खारघर मध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील 689 घरांसाठी यामध्ये समावेश असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ठिकाणे सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी आहेत म्हणजेच जवळपास रस्ते, मेट्रोसेवा आणि रेल्वे स्थानक आहेत. त्यामुळे इथे घर घेण्याची सुवर्णसंधी सिडको न उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल तर येत्या 27 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या जाहिरातीकडे आवर्जून लक्षात ठेवा.

आवश्यक कागदपत्रे

सिडकोच्या लॉटरीसाठी (CIDCO Lottery 2024) तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काही कागदपत्र तुमच्या जवळ असणं गरजेचे आहे. मतदार ओळखपत्र,आधार कार्ड,पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि मिळकत दाखल्याचा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत