हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडानंतर आता सिडकोने सुद्धा नवी मुंबई विभागात घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सिडकोने तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
सिडकोने गेल्या २ वर्षांत २ टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली होती. यामधील जवळपास ७ हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. तर अनेक घरांची देयके भरण्यास ग्राहक असमर्थ ठरल्याने त्यांची घरे पुन्हा ताब्यात घेण्यात आली आहे. या सर्व घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने जाहिरातही काढली, मात्र जाहिरातीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सिडकोने पुन्हा एकदा या घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या भागात मिळणार घरे ?
आता सिडको 5000 घरांची लॉटरी काढण्यासाठी सोडत काढणार आहे . तसेच ही सर्व घरे एकाच टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार एक स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली आहे. सिडकोची ही घरे वाशी , जुईनगर , खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली या ठिकाणी आहेत.