Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार

Adani Group
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Adani Group : हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अडचणीत आलेल्या अदानी ग्रुपसमोरील संकट कमी होण्याचे नाव घेईना. अशातच अदानी ग्रुपला आणखी एक धक्का बसला आहे. आता स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे बॉण्ड्स स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र, स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाच्या प्रवक्त्याने या रिपोर्टबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. याआधी देखील सिटी बँक आणि क्रेडिट सुइस सारख्या मोठ्या बँकांनी कर्जासाठी तारण म्हणून अदानी ग्रुपचे बॉण्ड्स घेण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ आता या बँकाकडून अदानी ग्रुपला कोणतेही कर्ज दिले जाणार नाही.

Citigroup stops margin loans against India Adani's securities - source, ET  EnergyWorld

काही दिवसांपुर्वींच आपल्या रिपोर्टमध्ये हिंडेनबर्गने Adani Group वर अनेक आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बँकांकडून अदानी ग्रुपच्या सिक्योरिटीज आणि बॉण्ड्स घेण्यास नकार देण्यात आला आहे. यानंतर आता अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या बाँडधारकांकडून आर्थिक सल्लागार आणि वकीलांशी चर्चा केली जात आहे.

हे लक्षात घ्या कि, हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून शेअर बाजारातील Adani Group च्या शेअर्सने तळ गाठला आहे. गेल्या 12 दिवसांत अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. अदानी ग्रुपच्या परिस्थितीमध्ये अजूनही सुधारणा झालेली नाही. त्याच वेळी, अदानी ग्रुपकडून आपल्या भागधारकांना सर्व काही ठीक आहे आणि भविष्यात गोष्टी बदलतील असे आश्वासन दिले जात आहे.

Explained: Why Hindenburg's bet against Adani Group confused rival US short  sellers - India Today

हिंडेनबर्ग रिपोर्ट नक्की काय आहे???

25 जानेवारी रोजी हिंडेनबर्गकडून Adani Group बाबत 32,000 शब्दांचा एक रिपोर्ट रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये 88 प्रश्नांचा समावेश आहे. या रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला की, अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे. या शेअर्सच्या वाढत्या किंमतींमुळे अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या तीन वर्षांत $1 अब्ज वाढ होऊन $120 अब्ज झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या काळात या ग्रुप मधील 7 कंपन्यांचे शेअर्स सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत. हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आतापर्यंत जवळपास 60 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adani.com/

हे पण वाचा :
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
PAN-Aadhaar Link : ‘या’ तारखेपर्यंत पॅन आधारशी करा लिंक, अन्यथा करावा लागेल अडचणींचा सामना
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत