नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। सोमवारी झालेल्या वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे एक तास तपशीलवार भाषण करावे लागले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शहा यांनी ठासून सांगितले. शहा यांच्या उत्तरानंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले.

या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायद मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल. असे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. त्यांनी “नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे. या विधेयकाचं समर्थन करणारे आपल्या देशाच्या जो पाया आहे त्याच्यावरच हल्ला करत आहेत,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

Leave a Comment