ग्रामीण भागातील हॉटेलमधून कांदा भजी गायब! सर्वसामान्यांना कांद्याचे भाव सोसवेनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी ।  मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मांदियाळीत कांद्याची स्थान अनन्यसाधारण आहे. त्यात कांदा भजी कोणाला आवडत नाहीत ? असा अन्नपदार्थांची चव वाढवणारा कांदा काही दिवसापासून मात्र स्वयंपाक घरातील आपले स्थान ही गमावून बसला आहे. एरवी 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे मिळणारा कांदा आता शंभरी पार केल्यामुळे हॉटेलमध्ये कांदा भजी व कांदा पोहे विकणे हॉटेल चालकांना परवडत नसल्यामुळे कांदा-भजी ग्रामीण भागातील हॉटेलमधून गायब झाली आहेत. तर सर्वसामान्यांनाही कांद्याचे भाव सोसवेनासे झाले आहेत.

गोल भजी, बटाटेवडा, बटाटा भजी, पालक भजी विकण्यात हॉटेल चालक पसंती देत आहेत. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसा तांबडा पांढरा रश्यासाठीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रश्याच चव काही वेगळीच असते. या खाद्यसंस्कृती बरोबर कांदाभजी लोकप्रिय खाद्यपदार्थाचा ठेवा. अलीकडच्या काळात कांद्यामुळे जवळजवळ कांदा भजी दिसेनाशी झाली आहेत. काही दिवसापासून बाजारामध्ये कांद्याची आवक कमी असल्यामुळे खानावळी हॉटेल स्वयंपाक घरातील जेवण पदार्थासह जेवणाच्या ताटातून सुद्धा कांदा गायब झाला आहे.

त्याचबरोबर स्वयंपाक घरातून कांदा महागाईमुळे महिला कांद्याची काटकसर करून सकाळच्या स्वयंपाकासाठी अर्धा तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी अर्धा कांदा वापरत आहेत. असाच कांद्याचा दर राहिला तर कांदाभजी मात्र चित्रातच पाहायला मिळेल. मात्र सध्या कांदा करतोय सगळ्यांचा वांदा असं विनोदाने म्हणत नागरिक सध्या कांद्याच्या विरहात दिवस काढत आहेत.

Leave a Comment