औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. परंतु लस न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरा डोस साठी वाट पाहणाऱ्यांची संख्या 95 हजारांपर्यंत पोहोचली आहे. या नागरिकांना शंभर ते दहा दिवस केव्हाच पूर्ण झाले असून मोबाईल वर दुसरी लस घेण्यासाठी सतत मेसेज येत आहेत. परंतु लस नसल्यामुळे घेणार कुठून असा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे. कोरोना महामारीला हरवण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. सर्वात आगोदर आरोग्य कर्मचारी फ्रन्टलाइन वर्कर जेष्ठ नागरिक यांना ही लस देण्यात आली.
आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस 29 हजार 130 तर दुसरा डोस 16 हजार 474 एवढ्या जणांनी घेतला आहे. त्याचबरोबर फ्रंट लाईन वर्कर्सचा पहिला डोस 37 हजार 630, दुसरा डोस 21 हजार 212, तर 18 ते 44 वयोगट पहिला डोस 1 लाख 54 हजार 391 आणि दुसरा डोस 10 हजार 539, 45 ते 59 वयोगटातील पहिला डोस एक लाख 794, तर दुसरा डोस 63हजार 568
आणि 60 वर्षावरील पहिला डोस 68 हजार 232 आणि दुसरा डोस 43 हजार 268 एवढ्या नागरिकांनी आतापर्यंत लस घेतली आहे.