भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्याच; नितेश राणेंची सडकून टीका

0
42
nitesh rane bhaskar jadhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत त्यांना तमाशातील सोंगाड्याची उपमा दिली.

मी सांगितले होते की, हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे!! तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला. अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्या मुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते? असे ट्विट नितेश राणे यांनी केले.

काय आहे प्रकरण-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण च्या बाजारपेठ मध्ये पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेले असता एका महिलेने उद्धव ठाकरेंना मदत मागितली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी सोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला धीर देण्याचे सोडून चुकीचं वर्तन केलं. या घटनेनंतर विरोधकांकडून भास्कर जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here