औरंगाबाद | शासनाच्या निर्देशां नुसार उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रथम डोस चे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. गेल्या १ मे पासून १८ ते ४४ नागरिकांना लसीकरण देणे सुरु झाले होते. या कालावधीत १२०० हुन अधिक १८ ते ४४ वयोगटाला लसीकरण देण्यात आले आहे. तरीही या कालावधीत लसीकरणास सत्यता पाहायला मिळाली नाही .
आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी देण्यात येत असलेल्या लसीकरणाचा पहिला डोस लसीकरणाची उपलब्धता कमी असल्यामुळे तूर्त स्थगित करण्यात आलेला आहे. तसेच इतर नागरिकांना देखील पहिला डोस तूर्त मिळणार नाही.
उद्यापासूनज्या नागरिकांनी यापूर्वी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे व त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा नागरिकांना उद्यापासून सर्व लसीकरण केंद्रावर दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी गर्दी करू नये .असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केले.