साताऱ्यात 54 गावातील नागरिकांचा पाण्याच्या मागणीसाठी मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून देखील बोंडारवाडी धरण भागातील लोकांना शेतीच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. वेण्णा नदीवर झालेल्या कण्हेर धरणातून वर उचलण्याच्या 6 टक्के पाण्यामधून शेतीला पाणी देण्यात यावे, अशी शासनाकडे मागणी करण्यासाठी कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रातील 54 गावांतील नागरिकांनी मोर्चा काढण्यात आला.

साताऱ्यात बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर आणि अति पावसाच्या प्रदेशात डोंगर उताराची शेती करणाऱ्या एकच पीक घेणाऱ्या जनतेची विदारक स्थिती आहे. या भागातील जनता 1880 सालापासून उपजीविकेसाठी मुंबईला जात आहेत. या भागातील लोकांसाठी 6 टक्के पाणी शेतीसाठी व पाण्यासाठी वरच वेगळे धरण बांधून द्यावे.

प्रांत यांच्यासोबत प्रशासनासोबत सकारात्मक बैठक झाली होती, मात्र इरिगेशन विभागाने फाटे फोडले. आता 5 एप्रिलच्या बैठकीत इरिगेशन विभागाने व्यवस्थित रिपोर्ट दिला. त्यानंतर शासनाकडे प्रस्ताव गेला की मार्ग पुढे जाईल. त्या बैठकी निर्णय न झाल्यास त्यानंतर कोणताही निर्णय येथे होणार नाही.