औरंगाबाद | कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊनमध्ये लसीकरण घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत होते. पण आता संसर्गाची लाट ओसरत असून लसीकरण केंद्रे ओस पडू लागली आहेत.
सध्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडे 35 हजार लस साठत शिल्लक आहे. 45 वयोगटातील सुमारे अडीच लाख नागरिक लसीकरणापासून दूर आहेत. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केले आहे. पालिकेमार्फत शहरात लसीकरण मोहीम राबवली जात असून मार्च एप्रिल महिन्यात करण्याची दुसरी लाट तीव्र झालेली असताना लसीकरणाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. लसीकरण केंद्र लांबच लांब रांगा लागत होत्या अनेक ज्येष्ठांना लस न घेता घेता केंद्रावरून परत फिरावे लागले होते.
त्यावेळी लसीचे मागणी मोठ्या प्रमाणात असतानाही पुरवठा मात्र कमी होत होता. त्यातच केंद्र सरकारने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना कोविडशिल्डच्या दोन डोस मधील अंतर 84 दिवस केले. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी कमी झाली.18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती देण्यात आल्यामुळे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट झाला आहे.