Monday, February 6, 2023

भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही : सचिन पायलट

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश मधले महत्त्वाचे नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठच आता सचिन पायलट देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना चांगलाच वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पायलट नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनीदेखील पत्रकार परिषदे मधून आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेमुळे काँग्रेस नेते सचिन पायलट चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारताच पायलट यांनी त्यांच्यात मला भेटण्याची हिम्मत नाहीये अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन पायलट हेदेखील काँग्रेसला बाय-बाय करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. भाजपच्या काही नेत्यांकडून देखील अशा प्रकारची विधाने केली गेली आहेत. त्यामध्ये भाजप नेत्या रिटा बहुगुणा यांनी देखील नुकतंच त्यासंदर्भात विधान केल्यानंतर त्यांना सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रिटा बहुगुणा यांनी म्हटलं होतं की त्यांचे सचिनशी बोलणं झाले आहे. त्यांचा कदाचित सचिन तेंडुलकर सोबत बोलणे झाले असेल माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलंय.

- Advertisement -

रिटा बहुगुणा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. जितिन प्रसाद यांच्या प्रमाणे सचिन देखील लवकरच भाजपमध्ये दाखल होणार. यात काँग्रेस पक्षामध्ये त्यांना चुकीची वागणूक मिळते असं रिटा बहुगुणा म्हणाल्या होत्या. त्यावरच सचिन पायलट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.