Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

Citroen C3 Launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फ्रेंच वाहन (Citroen C3 Launch) उत्पादक कंपनी Citroen ने आज आपली आपली दुसरी एसयूव्ही भारतात लॉन्च केली आहे. Citroen C3 ही कॉम्पॅक्ट SUV असली तरी कंपनी ‘हॅचबॅक विथ अ ट्विस्ट’ या घोषवाक्याने या कारचा प्रचार करत आहे. या कारचे प्री-बुकिंग कंपनीने आधीच सुरू झाले आहे. चला आज आपण या कारचे वैशिष्टये आणि तिची किंमत जाणून घेऊया….

आरामदायी प्रवास- (Citroen C3 Launch)

Citroen C3 SUV भारतीय बाजारपेठेत 2,540 mm चा व्हीलबेससह लाँच केली आहे त्यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांना भरपूर जागा मिळेल. आरामाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. सिट्रोएनने दावा केला आहे की, मागील सीटच्या प्रवाशांना सेगमेंट बेस्ट लेग्रूम देखील असेल जेणेकरून त्यांना लांबच्या प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Citroen C3 Launch

इंजिन

Citroen C3 3 इंजिन पर्यायांमध्ये (Citroen C3 Launch) लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 1.2-लीटर नैचुरली-एस्पिरेटेड पेट्रोल मोटर आहे जी 81 Bhp आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल 109 Bhp आणि 190 Nm टॉर्क जनरेट करते. Citroen च्या दाव्यानुसार, १.२लीटर नॅच्युरली एस्पिरेट केलेले युनिट १९.८ kmpl चे मायलेज देईल. तर, टर्बोचार्ज केलेले युनिट १९.४ kmpl मायलेज देईल. या SUV मध्ये 5 स्पीड मॅन्युअल तसेच 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय दिसेल.

Citroen C3 Launch

वैशिष्टये-

या SUV च्या (Citroen C3 Launch) वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह 10.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते., 4 स्पीकर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी फास्ट चार्जर यासह अनेक फीचर्स पाहायला मिळतील.

Citroen C3 Launch

काय आहे किंमत-

या SUV ची किंमत 5.70 लाख असून टॉप व्हेरिएंटची किंमत 8.06 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. या SUV चा थेट सामना Tata Punch, Nissan Magnite, Maruti Suzuki Ignis, आणि Kia Sonet या सारख्या गाड्यांशी होईल.

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत