हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Citroen eC3) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Citroen India ने आज आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक eC3 11.50 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. कंपनीने 25,000 रुपयांमध्ये गाडीचे बुकिंगही सुरु केलं आहे.
320 किलोमीटर रेंज –
Citroen eC3 मध्ये, कंपनीने 29.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 57PS पॉवर आणि 143NM चा पीक टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 107 किमी/तास आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन इलेक्ट्रिक कार फक्त 6.8 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम आहे. Citroen eC3सिंगल चार्ज मध्ये 320 किलोमीटर रेंज देते.
कंपनीने Citroen eC3 साठी दोन चार्जिंग पर्याय दिले आहेत. यामधील DC फास्ट चार्जरच्या मदतीने या कारची बॅटरी केवळ 57 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते. याशिवाय 3.3kW ऑनबोर्ड AC चार्जर देखील आहे, जो CCS2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या चार्जरसह, त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 10.5 तास लागतात. पण DC फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 57 मिनिटात 10 ते 80% चार्ज होऊ शकत.
फीचर्स –
Citroen eC3 च्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये मॅन्युअल एसी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, कीलेस एंट्री, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर विंडो, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले 10 इंच टचस्क्रीन सिस्टम, कनेक्टेड कार टेकनिक यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनी या कारच्या बॅटरी पॅकवर 7 वर्षे/1,40,000 किमी वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्षे/1,00,000 किमी वॉरंटी आणि इलेक्ट्रिक हॅचबॅकवर 3 वर्षे/1,25,000 किमी वॉरंटी देत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीवरही एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे, मात्र त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.