औरंगाबाद | महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्चपासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील 6 एंट्रीपॉईंटवर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये चिकलठाणा येथे 403 पैकी 11 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे.
हर्सूल टी पॉईंटवर 267 पैकी 26 पॉझिटिव्ह, कांचनवाडी येथे 289 पैकी 15 पॉझिटिव्ह, झाल्टा फाटा येथे 191 पैकी 01 पॉझिटिव्ह, नगर नाका येथे 525 पैकी 4 पॉझिटिव्ह, दौलताबाद टी पॉईंट येथे 294 जणांची टेस्ट करण्यात आली. यात 8 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त माहिती नुसार सरकारी कार्यालयात अँटीजन कोरोना चाचणीत 13 पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
गुरुवारी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी कार्यालय येथे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यात मनपा मुख्यालय येथे 7 जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली. यात 1 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय येथे 27 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उच्च न्यायालय येथे 32 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 3 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरटीओ ऑफिस येथे 27 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे 18 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रजिस्ट्री ऑफिस येथे 20 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय येथे 14 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा