औरंगाबाद – थंडीचा ऋतू नंतर आता सूर्य तळपायला लागला असून, शहरातील तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काल शहरात तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला.
चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान 35.5 तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 35.5 अंश हे यावर्षीचे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. 23 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदले गेले. परंतु त्यानंतर अवकाळी पावसाच्या हजेरीने तापमानात किंचित घट झाली होती.
आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होत आहे. शहरात शनिवारी 33.7 अंश तापमान होते.