हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । City Union Bank: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता City Union Bank या 118 वर्षे जुन्या बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
18 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
City Union Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 18 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, आता बँक 7 दिवस ते 10 वर्ष मुदतीच्या डिपॉझिट्सवर सर्वसामान्य नागरिकांसाठी 5.00% ते 6.90% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00% ते 7.25% दराने व्याज देत आहे. याशिवाय, 444 दिवसांच्या कालावधीवर सर्वसामान्यांसाठी 7.75% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.00% इतका व्याजदर मिळेल.
City Union Bank च्या एफडीचे नवीन दर
आता बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर 5.00%,15 ते 45 दिवसांच्या FD वर 5.50%, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 5.75%, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 6.00% व्याजदर देत आहे. तसेच बँकेकडून 181 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 6.25%, 271 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.50%, 365 दिवस ते 443 दिवसांच्या FD वर 6.75%, 444 दिवसांच्या FD वर 7.75%, 445 ते 699 दिवसांच्या FD वर 6.95%, 700 दिवसांच्या FD वर 7.10% व्याजदर मिळेल. त्याच प्रमाणे बँक 701 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर आता 7.25% आणि पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7.00% व्याज दर देत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cityunionbank.com/deposit-interest-rate
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये