सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जागतिक स्वच्छता दिनानिमित्त क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहिमी राबविली. यावेळी राज्य शासनाने सुंदर माझा दवाखाना या राबवलेल्या उपक्रमाची त्यांनी आठवण करून दिली.
“सुंदर माझा दवाखाना” उपक्रमा अंतर्गत स्वच्छता दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.
Satara News : जिल्हा शासकीय रुग्णालयात 'सुंदर माझा दवाखाना' उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांकडून स्वच्छता pic.twitter.com/nj3035KDqM
— santosh gurav (@santosh29590931) April 8, 2023
हा उपक्रम दि. 7 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालयात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त आरोग्य सेवक, कर्मचारी आणि पधाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.