हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक रस्ते पूर्णपणे पाण्यखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. काही नागरिक या हाहाकारात गायब झाले असून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन करतानाच एक विडिओ व्हायरल झाला आहे.
ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे सिन्नरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यात येत आहे. रात्रीपासून मदत यंत्रणा सुरु झाली असून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आपण या विडिओ मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून जेसीबीवर बसवून नागरिकांचे स्थलांतर केलं जात आहे.
नाशिक मध्ये ढगफुटी सदृश पाऊस… जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन pic.twitter.com/6GSJWyT2ue
— Akshay Patil (@AkshayP21845027) September 2, 2022
दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा पावसानं जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धो धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.