CM Announcement For Farmers | आपल्या देशातील 70% पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशाला मिळणारे अन्नधान्य हे शेतकरी पिकवतात. आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात.जे करून शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता येईल. अशातच आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे आता शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केलेली आहे. (CM Announcement For Farmers)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डचा डिजिटल प्रकल्प प्रणालीच्या शुभारंभ प्रसंगी ही घोषणा केली. या सोहळ्यामध्ये ते प्रत्यक्ष हजर नव्हते परंतु ऑनलाईन पद्धतीने त्यांनी त्यांची हजर या कार्यक्रमात दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी ऑनलाईन ही घोषणा (CM Announcement For Farmers) केलेली आहे.
याप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात क्रांती येणार आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट पैसे जमा करण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांनी प्रगतशील व्हावे. त्याचप्रमाणे सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी पंतप्रधान मोदींनी संकल्प केलेला आहे. डिजिटल क्रांतीचा वापर करून त्यांना शेतकरी कृषी क्षेत्राचा विकास करायचा आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचे ही जपणारे सरकार आहे. सरकारकडून अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. आणि इथून पुढे देखील जाईल. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार हे सगळ्यांनी योजनांचे नियोजन करत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल. महायुतीच्या सरकारने गेल्या दीड वर्ष शेतकऱ्यांना 45 हजार कोटींची मदत केली होती. संचनाचे 121 प्रकल्प केले होते यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.