हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभेच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासमवेत मतदान केलं. केजरीवाल यांनी आई-वडील तसेच
आपली पत्नी सुनीता आणि मुलगा पुलकित यांच्याबरोबर मतदान केले. केजरीवाल यांच्या मुलाने या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन दिली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “सर्वानी मतदान जरूर करा, सर्व महिलांना माझं विशेष आवाहन आहे- तुम्ही ज्याप्रमाणे घराची जबाबदारी पार पाडता त्याचप्रमाणे देशाची आणि दिल्लीचीही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.” तुम्ही सर्व स्त्रिया मतदान करायला जा आणि आपल्या घरातील पुरुषांनाही घेऊन मतदान करायला सोबत घेऊन जा.”
दरम्यान सिव्हिल लाईन्स परिसरातील मतदान केंद्रावर मत दिल्यानंतर केजरीवाल म्हणाले, ” मला आशा आहे की आम्ही दिल्लीत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार. मला विश्वास आहे लोक आमच्या कामाला मतदान करतील”.
Voted along with my family, including my first-time voter son. Urge all young voters to come out to vote. Your participation strengthens democracy. pic.twitter.com/QU8wUZ18hv
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.