Thursday, March 30, 2023

मराठवाड्याला हक्काचे पाणी दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू! देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या! तसे न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, पण मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. असा इशारा परभणीतील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

परभणीमध्ये शुक्रवार दिनांक ७ जानेवारी रोजी संजीवनी कृषी महोत्सव राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिंतूरच्या आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.मोहन फड वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण , संजीवनी कृषी महोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही आता विरोधी पक्षात आहोत. कोणत्याही गोष्टीला विरोध म्हणून विरोध करणार नाही, पाण्या संदर्भातील प्रकल्पामध्ये सरकारला पाहिजे असेल ती मदत आम्ही करू, पण अशा प्रकारच्या प्रकल्पाला शासनाने बाजूला ठेवले ,त्यांना चालना नाही दिली व मराठवाड्याच्या हिश्‍श्‍याचे पाणी मराठवाड्याला मिळू दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू ! असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

संघर्ष करण्यापेक्षा समन्वयातून विरोधी पक्षाचीही सरकारने मदत घ्यावी, नाहीतर त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर मराठवाड्याच्या हिश्‍श्‍याचे प्रकल्प पूर्ण करावेत अशी ही अपेक्षा राज्यातील महाविकास आघाडीकडून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. एकूणच काल परभणी मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भाषणामध्ये शेतकरी धोरण, मराठवाड्याचे पाणी, मुंबईतील नाईट लाईफ या विषयावर राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.