मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोडमॅप ; स्वस्त वीज आणि दुष्काळमुक्त मराठवाड्याचे आश्वासन

0
2
fadnvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजनांचा रोडमॅप मांडला. फडणवीस यांच्या भाषणात सरकारच्या योजनांसोबतच विरोधकांना त्यांची जागा दाखवताना विकासाची गती आणि दिशा ठरवणाऱ्या अनेक योजनांचा उल्लेख करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, १५ एप्रिलला त्यांचं सरकार १०० दिवस पूर्ण करणार आहे. त्या नंतर मंत्र्यांच्या कामाची समीक्षा केली जाईल. जे मंत्रिमंडळ सदस्य चांगले कार्य करतील, त्यांचा गौरव केला जाईल, तर जे कमी कामगिरी दाखवतील त्यांना निगेटिव्ह लिस्ट मध्ये ठेवले जाईल. फडणवीस यांनी असेही स्पष्ट केले की, त्यांचा विश्वास आहे की निवडणुकीत मिळालेला जनादेश राज्याच्या विकासासाठी आहे आणि ते त्याप्रमाणे कार्य करतील.

मुख्यमंत्र्यांचे ठळक मुद्दे

समन्वयाने काम करणारे सरकार : मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार तीन सदस्यीय (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि मंत्री) एक मजबूत टीम म्हणून काम करणार आहे. सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील.

कापूस खरेदीची वाढ: राज्य सरकार कापूस खरेदीचा पल्ला २०१६-१७ च्या तुलनेत अधिक करणार आहे. २ लाख मेट्रीक टन कापूस अधिक खरेदी करण्यात आला आहे. कापूस खरेदीसाठी अधिक केंद्रे उभारली जात आहेत. यासाठी केंद्राकडून मुदतवाढ मागण्यात आली आहे.

दुष्काळ मुक्त मराठवाडा: फडणवीस यांनी सांगितले की, मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे सात जिल्ह्यांतील १० लाख एकर जमिनीला फायदा होईल. ४२६ किमी नवीन कालवा तयार करण्यात येईल, ज्यामुळे विदर्भातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ६ ते ८ वर्षांचा कालावधी लागेल.

पाणी वळवण्याच्या योजना मराठवाड्याच्या पाणी संकटाचा स्थायी उपाय म्हणून जायकवाडी धरणावर काम सुरू आहे. त्यासाठी नवीन धरण बांधण्याचे काम सुरू आहे, ज्यामुळे मराठवाड्यात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आणि विविध वाद मिटतील.

औद्योगिक क्लस्टर तयार करणे: संभाजीनगर आणि जालना येथे नवीन औद्योगिक क्लस्टर्स तयार होणार आहेत, ज्यामुळे पाणी आणि इतर सुविधा या क्षेत्रांमध्ये आणखी सुधारेल. हे प्रकल्प स्थानिक उद्योगांना बळकट करणार आहेत.

भविष्यातील विकासासाठी मजबूत दृषटिकोन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सरकारच्या आगामी योजनांचा मुख्य उद्देश राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती देणे आणि प्रत्येक विभागात सुधारणा करणे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांद्वारे राज्यात पाणी, शेती, उद्योग आणि वीज यामध्ये सुधारणा केली जाईल.
त्यांच्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे, आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या स्थानिक गरजांनुसार त्यात सहभागी करण्यात येईल.