ST दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यप्रदेश येथील एसटी दुर्घटनेत महाराष्ट्र्रातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण अजूनही बेपत्ता आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आणि आर्थिक मदत जाहीर केली

हि अतिशय दुर्दैवी घटना आहे, मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र शासन मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशील असून त्यांना १० लाख रुपयांची मदत निधी जाहीर करतो एकनाथ शिंदे म्हणाले. मी स्वतः मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी देखील हि घटना गांभीर्याने घेतली असून त्यांनी एक मंत्रीही तिकडे पाठवला आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृत पावलेल्या नागरिकांबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर अपघातातील जखमींना 50 हजारांच्या मदत जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून स्थानिक प्रशासन जखमींना आवश्यक त्या सेवा पुरवत आहे असेही मोदी म्हणाले.

नेमका अपघात कसा झाला –

इंदोरहुन जळगावकडे निघालेल्या बसला मध्यप्रदेशच्या धार येथे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस काही तांत्रिक बिघाडामुळे खलघाट संजय सेतू पुलावरून थेट 100 फूट खाली नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचीही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.